Rashmi Mane
काश्मीर हे धरतीवरची सर्वात सुंदर ठिकाणं, हे नाव आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. काश्मीरच्या एक अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण म्हणजे पहलगाम घाटी.
याच पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जखमी झाले.
या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालेय. पहलगामच्या या परिसराला मिनी स्वित्झर्लंड असल्याचही बोललं जातं.
पहलगाम, काश्मीरमधील एक पर्वतीय प्रदेश आहे. जिथे आल्यानंतर एक प्रकारची शांती आणि नैसर्गिक सुंदरता आपल्याला अनुभवायला मिळते.
घनदाट जंगलं, निरंतर वाहणाऱ्या नद्या आणि गवताने आच्छादलेली डोंगरं..
पहेलगाम हे केवळ जम्मू-काश्मीरमधील एक सुंदर पर्यटनस्थळ नाही, तर गेल्या कित्येक दशकांपासून बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचंही अत्यंत आवडतं शूटिंग लोकेशन राहिलं आहे.
निसर्गरम्य डोंगररांगा, नद्या आणि हिरवाई यांनी नटलेलं हे ठिकाण सिनेमॅटिक दृश्यांसाठी अत्यंत योग्य मानलं जातं.
बॉलिवूडमधील काही संस्मरणीय सिनेमांचं शूटिंग पहेलगाममध्ये झालं आहे. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा सुपरहिट चित्रपट बॉबी (1973) मधील अनेक सुंदर दृश्यं याच परिसरात चित्रीत करण्यात आली होती.
त्यानंतर सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या बेताब (1983) या सिनेमातही पहेलगामचं अप्रतिम सौंदर्य प्रेक्षकांना दिसून आलं.
बैसरन टेकडी, ममलेश्वर मंदिर, अवंतीपूर मंदिर, पहलगाम गोल्फ कोर्स, अरु गाव आणि दरी, चंदनवाडी, शेषनाग तलाव, बेताब व्हॅली