Rajanand More
पाकिस्तान शेअर बाजार गडगडला आहे. बुधवारी बाजर 1200 अंकांनी घसरून 117226 अंकांवर स्थिरावला. पुढेही बाजारात धक्के बसण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश म्हणजेच आयएमएफने नव्या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानची जीडीपी वाढ 3 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांपर्यंतच होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
केवळ आयएमएफ नव्हे तर विदेश रेटिंग एजन्सी फीच रेटिंगनेही पाकिस्तानला इशारा दिला आहे. फीचच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी रुपया जून महिन्यापर्यंत 285 पर्यंत घसरू शकतो.
भारताने पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडत सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताने अटारी चेकपोस्ट बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानेच 3 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या चेकपोस्टवरूनच पाकिस्तानातून भारतात अनेक उत्पादने पाठविली जातात.
वर्ल्ड बँकेने पाकिस्तानमध्ये गंभीर खाद्य असुरक्षेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा गरिबीचा स्तर वाढू शकतो.
भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यांना तातडीने परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताना SAARC Visa अंतर्गत दिली जाणारी सूटही रद्द केली आहे. पुढील ४८ तासांत त्यांना भारत सोडावा लागणार आहे.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील सुरक्षा सल्लागारांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी एका आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत खाली आणली आहे.
पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक करताना भारताने पाकिस्तान सरकारचे एक्स अकाऊंट बॅन केले आहे. पाकिस्तानेच एक्स अकाऊंट भारतात दिसणार नाही.