Jagdish Patil
कराचीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या नावाखाली पाकिस्तानने अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले केले.
कराची हल्ल्याची जबाबदारी ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेने घेतली होती.
कराचीमध्ये निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर २४ तासांच्या आत पाकिस्तानने ही कारवाई केली.
पाकने आपण TTP आणि 'जमात-उल-अहरार' या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.
मात्र, या कारवाईचे फोटो समोर आलेने पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या वेळीही निवासी भागांना लक्ष्य केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
यामध्ये ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे १०० हून अधिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अफगाणिस्तानातून हल्ल्याचे जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे.
अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील गियान, पक्तिया प्रांतातील चमकानी आणि कुनार प्रांताला पाकिस्तानी हवाई दलाने लक्ष्य केलं.