Rashmi Mane
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे.
दहशतवादी हल्ला झाल्याने भारताने पाकिस्तान विरूद्ध कडक अॅक्शन घेयला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत- पाकिस्तान युद्ध होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पण जर युद्ध झाले तर पाकिस्तानी सैन्य भारताविरुद्ध किती काळ उभे राहील? आणि पाकिस्तानची लष्करी ताकद किती ?
तस तर २०२५ च्या ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान ९ व्या स्थानावरून १२व्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तानकडे एकूण १,३९९ विमाने आहेत, ज्यात ३२८ लढाऊ विमानांचा समावेश आहे. तर पाकिस्तानकडे ४ एअर टँकर आणि ३७३ हेलिकॉप्टर आहेत.
पाकिस्तानची सागरी सीमा फक्त अरबी समुद्राशी आहे. ८ पाणबुड्या तर पाकिस्तानकडे एकही विध्वंसक नाही. तसेच पाकिस्तानकडे एकही विमानवाहू नौका नाही.
पाकिस्तानी सैन्यात ६ लाख ५४,हजार सैनिक आहेत. तर ५ लाख निमलष्करी दल आहेत २,६२७ रणगाडे आहेत.