Rashmi Mane
गाव, राजकारण आणि विनोदाचं नवं पर्व सुरू होणार.
'पंचायत' ही Amazon Prime ची गाजलेली वेबसिरीज पुन्हा येतेय. चौथ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे!
या ट्रेलरमध्ये दिसतोय अभिषेक त्रिपाठीचा (जितेंद्र कुमार) संघर्ष. गावातलं राजकारण, सत्तासंघर्ष आणि त्यात अडकलेला एक शिकलेला तरुण!
गावात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रल्हाद, विकास आणि पंचायत सदस्यांमध्ये वाद-विवाद, कटकारस्थानं असणार आहे.
सामाजिक विषयांवर भाष्य करताना विनोदी पद्धतीने मांडणी हीच 'पंचायत'ची खासियत आहे.
प्रेक्षकांच्या लाडक्या पात्रांचं दमदार पुनरागमन! प्रधानजी, मनजू देवी, विकास, आणि प्रल्हाद यांची सशक्त केमिस्ट्री पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
हास्यासोबत काही भावनिक क्षणही ट्रेलरमध्ये झळकतात. एक मित्र, एक अधिकारी आणि एक माणूस म्हणून अभिषेकच्या प्रवासाला नवी कलाटणी!
चौथ्या सिझनमध्ये कोण होईल विजेता? कोण गमावेल सत्तेचं बळ? ट्रेलरनेच वाढवलीय उत्कंठा त्यामुळे संपूर्ण या सिझन स्पेशलचं असणार आहे.