Pandit Jawaharlal Nehru: चाचा नेहरूंच्या या गोष्टी, तुम्हाला माहित आहे का?

सरकारनामा ब्युरो

"मुलं म्हणजे देवा घरची फुलं" असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात 'बालदिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

Pandit Nehru | Sarkarnama

सगळी लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारीत. नेहरूंनी आपल्या कार्यकाळात लहान मुलांच्या कल्याणासाठी अनेक योजना केल्या होत्या.

Pandit Nehru | Sarkarnama

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.

Pandit Nehru | Sarkarnama

स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांचे नेते, लेखक, तत्त्वचिंतक, त्यागी, रसिक, एक द्रष्टा राजकारणी या अनेक व्यक्तिमत्वाच्या पैलूंमुळेच महात्मा गांधींनी नेहरूंना पहिले पंतप्रधान म्हणून पसंती दिली होती.

Pandit Nehru | Sarkarnama

शास्त्रीय संशोधनाबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व प्रशिक्षण प्रसार याला नेहरूंनी जाणीवपूर्वक उत्तेजन दिले. आयआयटी, आयआयएम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलाॅजी, अभियांत्रिकी महाविद्यालये त्यांच्या कार्यकाळात स्थापन केल्या.

Pandit Nehru | Sarkarnama

जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात त्यांनी काम सुरू केले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ घेत इतिहास रचला.

Pandit Nehru | Sarkarnama

जवाहरलाल नेहरू गांधीजींपेक्षा 20 वर्षांनी लहान होते. महात्मा गांधींचे स्वयं-घोषित शिष्य असूनसुद्धा गावातील अर्थव्यवस्था, अहिंसा, धर्म आणि आर्थिक विचारांबद्दलच्या दृष्टिकोनांबद्दल त्यांच्यात प्रचंड मतभेद होते.

Pandit Nehru | Sarkarnama

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जितके चांगले राजकारणी होते.तितकेच ते लहान मुलांच्या विश्वात रमायचे. या लहान मुलांसोबत तासनतास गप्पा मारायला नेहरूंना आवडायचं.

Pandit Nehru | Sarkarnama

नेहरू आपल्या नातवांनाही आवर्जून वेळ द्यायचे. राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यासोबतचा हा फोटो...

Pandit Nehru | Sarkarnama
Sarkarnama