सरकारनामा ब्यूरो
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज ( 26 जुलै ) वाढदिवस.
वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडेंनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत ही माहिती त्यांनी दिली आहे.
'माझ्या वाढदिवशी मला भेटायला येऊ नका. मी मुंबई बाहेर जात आहे. यासाठी आपण जिथे आहात, तिथून मला शुभेच्छा द्या. त्या माझ्यापर्यंत पोहोचतील', असं पंकजा मुडे म्हणाल्या आहेत.
'वाढदिवशी भेदभाव नाही अगदी कोणालाच भेटले नाही..माझा मुलगा आर्यमन आणि मी !! तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन... तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतच आहेत' अशी माहिती ट्विट करत पंकजा मुंडे यांनी दिली.
तिरुपती येथे श्रीकालहस्तीच्या दर्शनासाठी त्यांचा मुलगा आर्यमन यांच्यासोबत त्या गेल्या आहेत.
मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते भगवान गडावर गेले होते.
भगवान गडावरचा फोटो शेअर करत 'माझ्यासाठी ही अनमोल भेट', असं पंकजा मुंडे म्हणल्या.