Roshan More & दत्त देशमुख
विधान परिषदेवर विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे सोमवारी बीड जिल्ह्यात आल्या. सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावर बाबांचे दर्शन घेतले.
भगवान बाबांच्या पुतळ्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली.
पंकजा मुंडे यांनी श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन नगद नारायण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
गडाचे महंत ह.भ.प शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद पंकजा मुंडे यांनी घेतले.
बीडमध्ये पोचल्यानंतर पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली.
किन्ही येथील ऊसतोड मजूर भीमराव वनवे यांनी पंकजा मुंडे यांची पे तुला करून आपला संकल्प पूर्ण केला.
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या, आपली खरी ताकद ही आपली एकजूट आहे. कोणत्याही जाती, धर्म ,पंथ पक्ष या पलीकडे जाऊन ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे.
पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आदी उपस्थित होते.