Parliament Attack : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्लाची २१ वर्षे..

सरकारनामा ब्यूरो

२१ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच १३ डिसेंबर २००१ रोजी लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. 

Parliament attack | Sarkarnama

जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी संसद भवनाच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते.

Parliament attack | Sarkarnama

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसद भवनातून बाहेर पडले होते. मात्र, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 100 जण संसद भवनात होते.

Sonia Gandhi, Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

AK47 रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि ग्रेनेड्स घेऊन दहशतवाद्यांनी संसद परिसराभोवती तैनात असलेला सुरक्षा तोडली. ही दहशतवादी कारवाई सुमारे ४५ मिनिटे चालली.

Parliament attack

हल्ल्याची माहिती मिळताच पुढच्या काही मिनिटांत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवान घटनास्थळी पोहचले आणि काही मिनिटातच सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Parliament attack

या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता. संसद हल्ल्याच्या १२ वर्षांनंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरुला फाशी देण्यात आली.

Afzal Guru | Sarkarnama

देशावरील या दहशतवादी हल्ल्याचे मनसुबे उधळून लावताना ९ जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यात वृत्तसंस्था एएनआयचा कॅमेरामन विक्रम सिंह बिश्त यांचाही मृत्यू झाला.

Parliament attack | Sarkarnama

संसदेच्या संकुलात घुसून दहशतवाद्यांना नेते आणि मंत्र्यांना लक्ष्य करायचे होते, परंतु सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे ते अपयशी ठरले आणि तिथेच मारले गेले.

Parliament attack | Sarkarnama
CTA image | Sarkarnama
येथे क्लिक करा