सरकारनामा ब्यूरो
IAS अधिकारी सरजना यादव अभिनेत्री पेक्षा कमी नाहीत.
IAS सरजना यादव या 2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. गुगलच्या मदतीने त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली आहे.
UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेदवारांना अनेक वर्षे लागतात. परंतु काही उमेदवार स्वयं अध्ययनच्या आधारे ही परीक्षा उत्तीर्ण करतात. सरजना यादव त्यापैकीच एक आहेत.
अपयशानंतरही हार न मानता अथक प्रयत्नांच्या जोरावर 2019 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत भारतात 126 वा क्रमांक मिळवला.
'आयएएस' सरजना यादव यांनी दिल्ली विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
पदवीनंतर सरजना यांनी ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. नोकरीसोबतच, सरजनाने यूपीएससी परीक्षेची तयारी केली, पण पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयश आले.
परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सरजनाने 2018 मध्ये नोकरी सोडली. 2019 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत भारतात 126 वा क्रमांक मिळवत आयएएस झाल्या.