Rashmi Mane
2014 ला पंतप्रधान झाल्यापासून गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही.
पुण्यातील 'आरटीआय' कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी RTI दाखल करून पंतप्रधान मोदींनी किती दिवस सुट्टी घेतली, अशी माहिती RTI च्या अंतर्गत मागवला होता.
माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नांवर 'पीएमओ'चे अधिकारी सचिव परवेश कुमार यांनी उत्तर दिले आहे.
“पंतप्रधान नेहमीच कामावर हजर असतात. मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज 18-20 तास काम करतात आणि परदेश दौऱ्यावर असताना वेळ वाचवण्यासाठी ते विमानात झोपतात, असे अनेक वेळा सांगण्यात आले आहे.
मे 2014 मध्ये मोदी पंतप्रधान बनल्यापासून 3,000 हून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
2015 मध्ये अशाच एका 'आरटीआय' अर्जाच्या उत्तरात नमूद केले होते, की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यालयातील पहिल्या कार्यकाळात कामावरून एकदाही सुट्टी घेतली नव्हती.
2019 मध्ये, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील दावा केला होता, की पंतप्रधान मोदींनी पद धारण केल्यापासून 20 वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही.