Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांच्या आगमनाबाबत झारखंडमधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
मोदींच्या रांचीमधील 'रोड शो'ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
भगवान बिरसा मुंडा यांची पवित्र भूमी असलेल्या झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच बिरसा मुंडा विमानतळ, रांची येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे स्वागत केले.
आज (15 नोव्हेंबर) भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे. यानिमित्त हा दिवस (आदिवासी गौरव दिन) म्हणून साजरा केला जातो.
PM मोदींनी झारखंडमधील बिरसा मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू येथील जन्मस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.