Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील कुमाऊँ प्रदेशाच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत.
मोदींनी भगवान शंकराचे निवासस्थान असलेल्या कैलास शिखर आणि पार्वती कुंडाचे दर्शन घेतले.
भारत-चीन सीमेवरील पिथौरागढ येथे जाणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
नरेंद्र मोदींचे उत्तराखंडमधील फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या दौऱ्यात नरेंद्र मोदी जागेश्वर धामलाही भेट देणार आहेत.
मोदी पिथौरागढमध्ये ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.