PM Modi Meets Team India: पंतप्रधान मोदींनी टीम इंडियासह गायलं राष्ट्रगीत

सरकारनामा ब्यूरो

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

Narendra Modi | Sarkarnama

या सामन्याच्या आधीच दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियमवर दाखल झाले होते.

Narendra Modi | sarkarnama

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्माला विशेष कॅप दिली आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सामन्यापूर्वी स्टीव्ह स्मिथला विशेष कॅप दिली.

Narendra Modi | Sarkarnama

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हर्ष सांघवी, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज यांचं स्वागत केलं.

Narendra Modi | Sarkarnama

नाणेफेकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज मैदानात फिरून प्रेक्षकांचं स्वागत करताना दिसले.

Narendra Modi | Sarkarnama

स्टेडिअममध्ये पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेतली.

Narendra Modi | Sarkarnama

स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी हा क्षण संस्मरणीय ठरला.

Narendra Modi | Sarkarnama

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही कसोटी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Narendra Modi | Sarkarnama

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

राष्ट्रगीतासाठीही देखील दोन्ही पंतप्रधान संघांसोबत उभे असल्याचं दिसलं.

Narendra Modi | Sarkarnama