Amit Ujagare
दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स समिटमध्ये PM मोदींनी रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना तमिळ क्लासिक ‘तिरुक्कुरल’ नावाचं रशियन भाषांतर केलेलं पुस्तक भेट दिलं.
पंतप्रधानांनी भेट दिलेलं पुस्तक हा प्राचीन तमिळ ग्रंथ आहे, जे कवी-तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांनी लिहिला आहे. याला ‘तमिळ वेद’ किंवा ‘यूनिव्हर्सल वेद’ म्हणूनही हा ग्रंथ ओळखला जातो. सुमारे २००० वर्षे जुना हा ग्रंथ आहे.
तीन भागांत विभागलेले – अरम (सदाचार/नैतिकता, ३८ अध्याय), पोरुल (अर्थ/राज्यशास्त्र, शासन, अर्थकारण, ७० अध्याय) आणि इनबम (प्रेम/आनंद, २५ अध्याय). हे धर्म, अर्थ आणि काम यांसारखे विषय कव्हर करते, पण यात मोक्षबाबत उल्लेख नाही.
२०२६ मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळने प्रकाशित केलेली रशियन आवृत्ती मोदींनी पुतीन यांना भेट दिली आहे. यात मूळ तमिळ श्लोक, त्यांचे ट्रान्सलिटरेशन आणि रशियन भाषांतर आहे.
नायरा मकर्चयन (Naira Mkrtchyan) या रशियन लिखिकेनं या ग्रंथाचं तामिळ भाषेतून रशियन भाषेत भाषांतर केलेलं आहे.
ब्रिक्स समिटच्या (१२-१३ सप्टेंबर २०२६) द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदींनी सांगितलं की, हे शाश्वत ज्ञान सीमा आणि भाषा ओलांडून जाते आणि भारत-रशिया लोकांमधील संबंध मजबूत करेल.
रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉय यांच्यावर या ग्रंथाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी जर्मन भाषांतराद्वारे तिरुक्कुरल वाचलं आणि त्यातील अहिंसा, सद्गुण आणि करुणेच्या संकल्पनांनी ते प्रभावित झाले.
टॉल्स्टॉय यांनी आपल्या ‘A Letter to a Hindu’ मध्ये तिरुक्कुरलमधील श्लोक उद्धृत केले आणि अहिंसेचे महत्त्व सांगितले. यामुळं महात्मा गांधींनाही या ग्रंथाची ओळख झाली आणि अहिंसा चळवळीवर प्रभाव पडला, असाही दावा केला जातो.
हे फक्त पुस्तक नाही तर भारत-रशिया संबंध मजबूत करणारं सांस्कृतिक प्रतीक आहे. प्राचीन तमिळ ज्ञान आणि रशियन बौद्धिक परंपरा यांच्यातील ऐतिहासिक दुवा आहे.