Rajanand More
वनतारा हे गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे. प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्याकडून या केंद्राचे कामकाज पाहिले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्डलाईफ या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान त्यांनी केंद्राचा फेरफटका मारला.
वनतारामध्ये सुमारे दोन हजारांहन अधिक प्रजाती आणि तब्बल दीड लाखांहून अधिक प्राणी आहेत. या प्राण्यांचे केंद्रात पुनर्वसन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी वनतारामधील प्राण्यांसाठीच्या विविध सुविधांची पाहणी केली. तसेच प्राण्यांसोबत काही वेळही घालवला.
सिंहाच्या बछड्याला पंतप्रधानांनी दूध पाजल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी विविध प्रजातींच्या सिंहाच्या बछड्यांशी खेळण्याचाही आनंद घेतला.
पंतप्रधानांनी प्राण्यांसाठीच्या रुग्णालयालाही भेट दिली. याठिकाणी सीटी स्कॅन, अत्याधुनिक आयसीयू, एमआरआर यांसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
वनतारामध्ये जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. मोदींनी याठिकाणी हत्तींना केळी खायला दिली.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केंद्रामध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट अंबानी हे उपस्थित होते.