Amit Ujagare
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विविध देशांच्या प्रमुखांनी त्यांना शुभेच्छा देताना नेमकं काय म्हटलंय? हे पुढच्या स्लाईड्समधून पाहुयात.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांनी मोदींना शुभेच्छा देताना म्हटलं की, मी लवकरच आपली भेट घेणार असून आपली मैत्री आणि प्रगती अनेक वर्षे टिकावी ही कामना करतो.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोदींना शुभेच्छा देताना म्हटलं की, पंतप्रधान मोदी, माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी भारतासाठी खूप काही केलं आहे. तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सूक असून याद्वारे आपली भागीदारी आणि मैत्री आणखी उंचीवर घेऊन जाता येईल.
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी मोदींना शुभेच्छा देताना म्हटलं, नमस्कार, माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी. आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त माझ्या आणि न्यूझीलंडच्या सर्व मित्रांकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. हा माईलस्टोन आपल्या नेतृत्वाची बुद्धिमत्ता दाखवतो. भारताला विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी न्यूझीलंड भागीदार ठरेल.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात, आमचे राष्ट्रीय सैनिक आणि भूतानच्या सर्व जनतेच्यावतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या आनंदाच्या क्षणी मी तुमच्या आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याची कामना करतो.
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मोदींना शुभेच्छा देताना म्हटलं की, मला शुभेच्छा देताना अत्यानंद होत आहे. तुमची प्रकृती उत्तम राहावी आणि आत्ता करत आहात तसंच भविष्यातही भारताचं नेतृत्व करत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. या अनिश्चित काळात आपल्या सर्वांना चांगल्या मित्रांची गरज आहे. मोदी कायमच माझे आणि ब्रिटनचे चांगले मित्र राहिले आहेत. लवकरच तुमची भेट होईल अशी मी आशा व्यक्त करतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्रुथवर म्हटलं, माझे मित्र पंतप्रधान मोदींशी मी फोनवरुन बातचीत केली आणि शुभेच्छा दिल्या. ते खूपच चांगलं काम करत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.