Rashmi Mane
नरेंद्र मोदी आज (२६ ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यासाठी आले आहेत.
भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) येथील विमानतळावर आगमन झाले.
शिर्डीतील विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत आले आहेत.
शिर्डीत स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.
साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचा प्रकाशन सोहळा या वेळी पार पाडला.
दौऱ्याच्या सुरुवातीला साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
मंदिरात भाविकांच्या उपस्थित नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधिस्थळी नतमस्तक झाले.
२०१८ नंतर आज पाच वर्षांनी नरेंद्र मोदी शिर्डीला दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
निळवंडे धरणाचं जलपूजन व विविध प्रकल्पांचं भूमिपूजन केले आहे.