Pradeep Pendhare
केंद्रपुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME योजनेतून देशाकरिता 10 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये केंद्राचा 60% तर राज्यांचा 40% हिस्सा असतो. ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जाते.
या योजनेअंतर्गत मुख्यत्वे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी खर्चाच्या 35% जास्तीत जास्त 10 लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाते.
या योजनेद्वारे शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी उत्पादकांना खर्चाच्या 35% आणि ब्रँडिंग इन मार्केटिंगसाठी खर्चाच्या 50% अनुदान दिले जाते.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सरासरी प्रकल्प कर्ज 11.68 लाख रुपये व सरासरी 4.27 लाख रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेद्वारे चार लाख रुपये प्रति बचतगट, अन् एका गटातील कमाल दहा सदस्यांना प्रत्येकी 40 हजार बीज भांडवल म्हणून दिले जाते.
या योजनेमुळे देशभरात दोन लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना थेट लाभ मिळाला असून 10 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण झाले आहेत.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत केंद्रस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याला यंदाचा प्रथम पुरस्कार मिळाला.
आता PMFME योजनेला 2026-31 या कालावधीसाठी पुढे वाढवण्याचा प्रस्ताव आहे.