CM Pramod Sawant Birthday Special: असा आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राजकीय प्रवास

अनुराधा धावडे

जन्म

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत यांच्या पोटी झाला.

CM Pramod Sawant | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून आयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर ऑफ सोशल वर्कमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

CM Pramod Sawant | Sarkarnama

50 वा वाढदिवस

प्रमोद सावंत गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांचा ५० वा वाढदिवस आहे.

CM Pramod Sawant | Sarkarnama

राजकीय कारकिर्दीला सुरुवात

ऑगस्ट 2012 मध्ये, ते गोवा उत्तराधिकारी, विशेष नोटरी आणि इन्व्हेंटरी प्रोसेसिंग बिलावरील निवड समितीचे सदस्य झाले.

CM Pramod Sawant | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

2012 ते 2014 पर्यंत त्यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी विशेषाधिकार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले.

CM Pramod Sawant | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

ऑगस्ट 2014 मध्ये, त्यांची गोवा शालेय शिक्षण (दुरुस्ती) विधेयकासाठी सदस्य म्हणून निवड झाली.

CM Pramod Sawant | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

2014 ते 2016 याकाळात त्यांनी याचिकांवरील समितीचे सदस्य म्हणून काम केले. याच काळात ते अर्थसंकल्प समितीचे अध्यक्षही होते.

CM Pramod Sawant | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

ऑगस्ट 2016 मध्ये, त्यांची गोवा कर्मचारी निवड आयोग विधेयकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

CM Pramod Sawant | Sarkarnama

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर 19 मार्च 2019 रोजी प्रमोद सावंत यांनी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

CM Pramod Sawant | Sarkarnama

NEXT : Akhilesh Yadav Dimple : अशी झाली अखिलेश यादव- डिंपल यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama
येथे क्लिक करा