Nitin Gadkari Birthday : कामातून देशभर छाप पाडणाऱ्या गडकरींचा 'असा' आहे राजकीय प्रवास

Sunil Balasaheb Dhumal

कामातून ओळख

देशभरातील कामांमुळे नितीन गडकरी 'पुलकरी' या नावानेही ओळखले जातात. कामातून ओळख निर्माण करणारे गडकरींचा २७ मे हा जन्म दिवस आहे.

Nitin Gadkari | Sarkarnama

आईचा प्रभाव

१९५७ चा जन्म असलेले नितीन गडकरी हे तरुण वयापासूनच संघाशी जोडले गेले होते. त्यांच्यावर त्यांच्या आई भानुताई यांचा प्रभाव होता.

Nitin Gadkari | Sarkarnama

वकिलीचे शिक्षण

त्यांनी बी.कॉमची पदवी घेतल्यानंतर एल.एल.बीचे शिक्षण घेतले.

Nitin Gadkari | Sarkarnama

राजकीय जीवनास सुरुवात

विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ मध्ये अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते.

Nitin Gadkari | Sarkarnama

आणीबाणीत केले काम

गडकरी २४ व्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरचे अध्यक्ष होते. आणीबाणीतही त्यांनी काम केले. पुढे नितीन गडकरी भाजप नागपूर शहराचे सचिव झाले.

Nitin Gadkari | Sarkarnama

विधान परिषदेचे सदस्य

१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले.

Nitin Gadkari | Sarkarnama

तरुण अध्यक्ष

ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होते. २००९-२०१३ या काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

Nitin Gadkari | Sarkarnama

राज्यात उल्लेखनीय काम

१९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून गडकरी यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

Nitin Gadkari | Sarkarnama

केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत.

Nitin Gadkari | Sarkarnama

NEXT : 'असा' होता विलासराव देशमुखांचा राजकीय प्रवास