मुलायम सिंहांच्या कुटुंबातच रंगणार राजकारण; अपर्णा यादव करणार अखिलेश यांच्याविरोधात प्रचार

अनुराधा धावडे

अपर्णा यादव या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पुत्रवधु आहेत

UP Politics

२०११ मध्ये त्यांनी मुलायमसिंह यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्याशी विवाह केला

UP Politics

गेल्या आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला.

UP Politics

दरम्यान, मैनपुरी लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

UP Politics

अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या समाजवादी पक्षाकडून उमेदवार आहेत

UP Politics

तर भाजपने रघुराज सिंह शाक्य यांना तिकीट दिले आहे.

UP Politics

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह संपूर्ण पक्ष ही जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

UP Politics

पण आता मैनपुरी लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव भाजपच्या प्रचारासाठी येणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

UP Politics

त्यामुळे युपीच्या मैनपुरी लोकसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

UP Politics
CTC Images
क्लिक करा