Sunil Balasaheb Dhumal
IAS पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळाचा आरोप केला आहे.
पुण्यात प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांनी आवास्तव मागण्या केल्या होत्या.
त्याबाबत राज्य सरकारला जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी अहवाल पाठवला होता.
दिवसेंच्या अहवालावर निर्णय घेत सरकारने खेडकरांना वाशिमला पाठवले.
आता खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडेच जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार चौकशीसाठी ठेवली आहे.
सुहास दिवसे यांनी कृषी आयुक्तपद, PMRDA चे सीईओ म्हणून काम पाहिले.
ते भंडाराचे जिल्हाधिकारीही होते. पिंपरी चिंचवड न्यू टाउन डेव्हलपमेंट एथॉरिटीचे प्रमुख होते.