Ganesh Sonawane
प्रफुल्ल लोढा हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील रहिवासी आहे. त्यांच्यावर 'हनी ट्रॅप' चा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गावात त्यांची वडिलोपर्जित शेती आहे. प्लॉट, सिनेमा थिएटर त्याच बरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिला आहे.
गिरीश महाजन सरपंच असल्यापासून प्रफुल्ल लोढा व त्यांची ओळख आहे. त्यानंतर भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून जवळपास वीस वर्ष त्यांनी सोबत काम केलं.
त्यानंतर महाजन यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांनीही राजकारणात एण्ट्री केली. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
गिरीश महाजन हे जेव्हा मंत्री झाले तेव्हा प्रफुल्ल लोढा हे महाजनांकडे मोठी कामे मागू लागले. त्यातूनच दोघांमध्ये खटके उडू लागले.
महाजन यांना शह द्यायचा या उद्देशाने लोढा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असल्याचं जाहीर करत त्याने थेट उमेदवारीही जाहीर केली होती. पण नंतर माघार घेतली.
त्यानंतर पुन्हा भाजपसोबत त्यांचे संबंध सुधारले व ते भाजपसोबत आल्याचे सांगितले जाते.
लोढावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक पोस्को कायद्याचा तर दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा आहे. पुण्यातही बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा यांचे जेष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्दव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेले फोटो समोर आणले आहेत. महाजन यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे.