Amol Sutar
22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्या विमानतळावर सकाळी 10.25 वाजता आगमन होणार आहे.
तेथून सकाळी 10.55 वाजता मोदी हेलिकॉप्टरच्या सहायाने राम जन्मभूमी परिसरात येतील. 11 ते 12 वाजेपर्यंत ते राम जन्मभूमी परिसराची पाहणी करतील.
12 वाजता पंतप्रधान मोदींचे राम मंदिराच्या गर्भगृहात आगमन होणार आहे. गर्भगृहाच्या अगोदरच्या ठिकाणी जवळपास 8 हजार आमंत्रित लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
12.05 ते 12.55 वाजण्याच्या दरम्यान मोदींच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी 12.55 वाजता राम मंदिरावर हेलिकॉप्टरच्या सहायाने पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्यास उपस्थित तसेच देशवासियांना प्रसारमाध्यमांच्या सहायाने संबोधित करतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार असून ते यावेळी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करतील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्यास आपली हजेरी लावणार असून ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील.
दुपारी 2.10 वाजता पंतप्रधान मोदी राम जन्मभूमी परिसरात असलेल्या कुबेर टीला याठिकाणी भेट देतील. त्याठिकाणी जीर्णोद्धार करुन जटायुची मुर्तीची स्थापना केली आहे.
मोदींनी 11 दिवस उपवास केला असून ते फक्त नारळपाणी सेवन करत आहेत. तसेच ते अंथरुणावरती न झोपता जमिनीवर झोपत आहेत. तर दररोज 1 तास 11 मिनिटे मंत्र जप करत आहेत.