President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची गगनभरारी! 'राफेल'मधून ऐतिहासिक उड्डाण!

Rashmi Mane

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सकाळी हरियाणातील अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून राफेल फायटर जेटमध्ये उड्डाण करत इतिहास रचला!

आत्मनिर्भर भारत

ही घटना भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भर भारतासाठीच्या संकल्पाचे जगासमोर मोठा पुरावा ठरली आहे.

अंबालाहून उड्डाणाचा क्षण

राष्ट्रपतींच्या या उड्डाणावेळी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऑपरेशनची माहिती

राफेलमधून हे उड्डाण सुमारे 30 मिनिटांचे होते आणि त्या काळात राष्ट्रपतींनी जेटच्या ऑपरेशनची प्रत्यक्ष माहिती घेतली.

साहस आणि नेतृत्वाची झलक

राष्ट्रपती मुर्मू यांचे हे पाऊल फक्त एक प्रतीकात्मक घटना नाही. तर महिलांच्या नेतृत्वशक्तीचे आणि ‘नवभारताच्या आत्मनिर्भरते’चे प्रतीक आहे.

याआधीचा अविस्मरणीय अनुभव

8 एप्रिल 2023 रोजी द्रौपदी मुर्मू यांनी असममधील तेजपूर येथून सुखोई-30 एमकेआय फायटर जेटमधूनही उड्डाण केले होते.

फायटर जेटमध्ये उड्डाण

त्या वेळी त्या फायटर जेटमध्ये उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या होत्या.

माजी राष्ट्रपतींची प्रेरणा

मुर्मूंच्या आधी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी सुखोई-30 एमकेआयमधून उड्डाण केले होते.

Next : UIDAI चा मोठा खुलासा, 'या' कामांसाठी Valid नाही आधार कार्ड

येथे क्लिक करा