Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत.
दोन दिवसांच्या इजिप्तच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी कैरोमधील गिझाच्या ग्रेट पिरॅमिडला भेट दिली.
इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली हेही पंतप्रधान मोदींसोबत होते.
पंतप्रधान मोदींनी एक हजार वर्ष जुन्या असणाऱ्या इजिप्त मधील 'अल हकीम मशिदी'ला भेट दिली आहे.
अल हकीम मशीद ही 11 व्या शतकात बांधली होती.
भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने या मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले होते.
जगातील सात आश्चर्यांमध्ये गिझाच्या पिरामिडचा समावेश आहे. गिझाचा ग्रेट पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा पिरॅमिड आहे.
नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर बांधलेल्या चौथ्या राजवंशाच्या तीन पिरॅमिड्सना मोदींनी भेट दिली आहे.