Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (२२ जून) ला व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या लॉनवर स्वागत केले.
दोन्ही देश लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
व्हाईट हाऊसमध्ये जमलेल्या लोकांशी मोदी यांनी संवाद साधला.
या भेटीमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध कौटुंबिक आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत पोहोचले आणि पंतप्रधान दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी भाषण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत सांगितले की, "मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो तेव्हा भारत दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे."
आता भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही वेगाने पुढे जात आहोत.