सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं.
नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने 'राजदंड'ची पूजा केली.
तामिळनाडूच्या मठातील संतांनी राजदंड (सेंगोल) सुपूर्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी साष्टांग दंडवत घातला.
भारताच्या नव्या संसद भवनामध्ये तामिळ परंपरेनुसार 'राजदंड'ची स्थापना करण्यात आली.
नव्या संसदभवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून इमारत चार मजली आहे.
संसदेच्या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं.