माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी 'पंतप्रधान शिष्यवृत्ती'; अर्ज कसा करणार? नियम काय? जाणून घ्या

Amit Ujagare

माजी सैनिक अन् एकल महिलांच्या (विधवा) पाल्यांना दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठीची अर्ज संकेतस्थळावर सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Scholarship

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रीय सैनिक मंडळ, नवी दिल्ली यांच्यातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Scholarship

बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ६० टक्के गुण मिळवलेल्या तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या माजी सैनिक, एकल महिलांच्या पाल्यांना ही वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.

Scholarship

या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना वार्षिक ३६ हजार रुपये, तर विद्यार्थ्यांना वार्षिक ३० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

Scholarship

पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

Scholarship

अभ्यासक्रमांची सूची तसेच योजनेच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित संकेतस्थळावर भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Scholarship

संबंधित वेबसाईट ही संरक्षण खात्याच्या अंतर्गत माजी सैनिकांच्या कल्याणकारी विभागाच्यावतीनं चालवली जाते.

Scholarship

या वेबसाईटवर माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठीच्या सर्वच प्रकारच्या योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Scholarship