Deepak Kulkarni
प्रा. राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा. शिंदे यांची जडणघडण झाली. परिस्थितीवर मात करत शिंदे यांनी एम. एस्सी. बीएड शिक्षण पूर्ण केले.
राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि.बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली.
१९९५ साली राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार आले आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्चशिक्षित असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली.
१९९७ मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेत भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडूक लढवली .मात्र, मतविभागणीचा फटका बसून २०० मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
२००० मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून शिंदेंनी प्रस्थापितांची ४० वर्षांची सत्ता घालवत एकहाती सत्ता मिळवून सलग पाच वर्ष सरपंचपद मिळवले.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर त्यांनी सत्तेच्या विरोधात असतानाही मतदारसंघात विकासकामे करत पकड मजबूत केली.
दरम्यानच्या काळात अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षपदी शिंदे यांची निवड झाली.त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ मध्ये ते मोठ्या फरकाने निवडून आले.
फडणवीस सरकारच्या काळात अगोदर राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांनी पार पाडली. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव...
शांत, संयमी नेतृत्व म्हणून शिंदे यांची ओळख असली तरी जनतेच्या प्रश्रासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत. मागील वर्षी झालेल्या विधान परिषदेची आमदारकी देत पक्षानं त्यांचं पुनर्वसन केलं.