Roshan More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रॅरिफ धोरण जाहीर केले आहे. त्याचा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला आहे.
ट्रम्प यांच्या धोरणा विरोधात अमेरिकेतली 50 राज्यातील 1200 शहरांमध्ये निदर्शन करण्यात आली.
मस्क मस्ट गो, अमेरिकेत राजेशाही नाही, ट्रम्प-मस्क चालते व्हा असे फलक घेऊन लाखो अमेरिकन रस्त्यावर उतरले.
डोनाल्ड ट्रम आणि ऐलाॅन मस्कर यांनी सरकार खर्चातील कपातीच्या नावावर अनेकांचे कामावरून कमी केले आहे. त्यामुळे बरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन उद्योगधंदे बंद पडतील, महागाई वाढेल, शेअर बाजार बंद होईल, अशी भीती निदर्शन करणारे नागरिक व्यक्त करत आहेत.
कोलोरॅडो, लाॅस एंडेलिसस, न्यू याॅर्क, वाॅशिंग्टन प्लोरिडा अशा शहरांमध्ये रॅली काढत ट्रम्प यांना विरोध करण्यात आला.
ट्रम्प हे उद्योगपतींच्या मदतीने देश चालवत आहेत. टॅरिफचे धोरण आर्थिक वेडपणा असल्याचे निर्देशन करणारे म्हणत आहेत.
अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या मालावर नवीन कर लावले जात आहे. अमेरिकेच्या मालावर जे देश जास्त कर लावतात त्याच प्रमाणे बाहेरील देशांकडून येणाऱ्या मालावर आयात शुल्क (टॅरिफ लावले जात आहे) भारताला 24 टक्के तर चीनला सर्वाधिक 34 टक्के टॅरिफ लावले आहे.