Girish Bapat Death News: पाच वेळा आमदार,दांडगा जनसंपर्क आणि ‘सर्वसमावेशक’ नेता ही ओळख अखेरपर्यंत जपणारे गिरीश बापट...

सरकारनामा ब्यूरो

खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळ आज (दि.२९ मार्च) निधन झालं आहेत.

Girish Bapat News | sarkarnama

बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Girish Bapat News | Sarkarnama

कसबा विधासनसभा मतदारसंघातून बापट १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत.२०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात सुमारे ५ लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. तत्पूर्वी महापालिकेतही नगरसेवक म्हणून ते तीन वेळा निवडून आले होते.

Girish Bapat News | Sarkarnama

पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

Girish Bapat News | sarkarnama

सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Girish Bapat News | Sarkarnama

पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध होते.

Girish Bapat News | Sarkarnama

कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मतदान केले होते.

Girish Bapat News | Sarkarnama

पुणे जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत होते. तसेच दांडगा लोकसंपर्क हे बापट यांची जमेची बाजू होती.

Girish Bapat News | Sarkarnama

Next : लवकरचं पूर्ण होणार आयोध्येतील राम मंदिर, किती काम झालं पूर्ण, समोर आले फोटो !

येथे क्लिक करा