Mangesh Mahale
पुणे-मुंबई दूतगर्ती महामार्ग आता दहा पदरी बनवला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयारी सुरु झाली आहे.
हा महामार्ग 2030 पर्यंत 10 लेनचा सुपर हायवे बनवला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा महामार्ग 10 पदरी बनवण्याचा निर्णय झाला आहे.
यासाठी 1420 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च 14,260 कोटी रुपये असेल.
2026 मध्ये याचे काम सुरू होईल आणि साधारणतः त्यातून पुढे चार वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.
प्रकल्पाचे काम हायब्रीड Annuity मॉडेल अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे.
40% निधी सरकारकडून तर उर्वरित 60 टक्के निधी खाजगी विकासकांकडून उभारला जाईल.
हा महामार्ग 94.6 किलोमीटरचा आहे. 13 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लींक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.