Jagdish Patil
पुण्यात रेव्ह पार्टीत झालेल्या छापेमारीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. ज्यामध्ये खेवलकर यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
खडसेंच्या जावयाला अटक केल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. तर हे प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत.
पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर लहानपणीचे मित्र असलेल्या प्रांजल यांच्यासोबत रोहिणी खडसेंनी लग्न केलं.
प्रांजल खेवलकर हे पत्नी आणि सासऱ्याप्रमाणे राजकारणात सक्रीय नाहीत. ते रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत.
खेवलकरांच्या नावावर साखर आणि ऊर्जा फिल्डमधील काही कंपन्या आहेत.
खडसेंचे जावई यापूर्वी सोनाटा लिमोझिन या कारमुळेही वादात सापडले होते.
या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.