सरकारनामा ब्यूरो
UPSC परीक्षा दरवर्षी लाखो तरुण देतात असाच एक UPSC टॉपर आहे ज्यांने IAS होण्यासाठी गुगलची नोकरी सोडली, पण हा टॉपर आज काय करतो जाणून घेऊयात...
2017 ला अनुदीप दुरीशेट्टी यांनी UPSC परीक्षा उत्तीर्णचं केली नाही तर, त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तेलंगणातील रहिवासी असलेल्या अनुदीप दुरीशेट्टी यांनी श्री सूर्योदय हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
2011ला त्यांनी BITS पिलानी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अभियंत्रिकेची पदवी मिळवली.
त्यांनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी केली. पण IAS होण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली.
2013 मध्ये दुसऱ्यांदा UPSC CSE परीक्षा दिली, त्यांच्या रँकनुसार त्यांना भारतीय महसूल सेवेत (IRS) स्थान मिळाले.पण त्यांना IAS व्हायचे असल्याने त्यांनी पाचव्यांदा परीक्षा देत प्रथम क्रमांक पटकावला.
IAS अनुदीप दुरीशेट्टी सध्या हैदराबादमध्ये जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत.