सरकारनामा ब्यूरो
कोणताही राजकीय वारसा नसताना जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपद अशी मजल मारणाऱ्या आर आर पाटील यांचा आज स्मृती दिन
हलाखीच्या परिस्थितीमुळे आबांना 'कमवा आणि शिका योजने'त काम करुन शिक्षण पूर्ण करावं लागलं.
सांगली जिल्ह्यामधील तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावी 16 ऑगस्ट 1957 ला आर आर आबांचा जन्म झाला.
सामान्य माणसाविषयी असलेली तळमळ आणि कामाचा आवाका आणि दणकेबाज निर्णयांच्या जोरावर पाटील हे शरद पवारांचे लाडके नेते बनले...
आघाडी सरकारमध्ये आर आर आबांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा राजकीय पटलावरचा संस्मरणीय प्रवास.
मंत्रिपदाच्या काळात अनेक लोकोपयोगी आणि धोरणात्मक निर्णयामुळे जनमानसांत वेगळी ओळख.
आबांनी डान्सबारवर बंदी घालायचीच असा पण केला आणि तो पूर्णही करुन दाखवला.
सत्ता सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उत्थानासाठी वापरायची असते हे आर आर पाटलांनी दाखवून दिला.