Rahul Gandhi Birthday : थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भिडणारा नेता राहुल गांधी

Sunil Balasaheb Dhumal

जन्म

काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी यांचा १९ जून १९७० रोजी दिल्ली येथे जन्म झाला. त्यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे.

Rajiv Gandhi and Rahul Gandhi | Sarkarnama

शिक्षण

राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमध्ये झाले. डेहराडून येथील द दून स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठ आणि फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Rahul Gandhi | Sarkarnama

पहिल्या निवडणुकीत मोठा विजय

राहुल गांधी यांनी २००४ मध्ये अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय झाला.

Rahul Gandhi | Sarkarnama

सरचिटणीस

राहुल गांधींची २००७ मध्ये काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. भारतीय युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे प्रभारी सरचिटणीस म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती.

Rahul Gandhi | Sarkarnama

उत्तर प्रदेशमधील यश

२००९ च्या निवडणुकीत राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडून आले. या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशामधील काँग्रेसच्या २१ जागा निवडूण आणल्या.

Rahul Gandhi | Sarkarnama

काँग्रेस अध्यक्ष

राहुल गांधी यांनी २०१७ ते २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

Rahul Gandhi | Sarkarnama

विरोधकांचा आवाज

लोकसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून थेट टीका केली. पुराव्यांसह अनेक प्रश्न विचारून केंद्र सरकारची कोंडी करण्यात गांधी नेहमीच अग्रेसर राहिले.

Rahul Gandhi | Sarkarnama

खासदारकी रद्द

२०१९ मधील वक्तव्यामुळे चार वेळा खासदार झालेल्या राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

जनसामान्यात मिसळणारा नेता

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी देशभरातील लोकांशी संवाद साधला. पंजाबमधील ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. बेंगळुरू येथे त्यांनी डिलिव्हरी बॉय यांच्याशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

भावी पंतप्रधान

काँग्रेस पक्षाकडून देशाचे भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचा उल्लेख केला जातो.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : चंद्रशेखर बावनकुळेंची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

येथे क्लिक करा