अनुराधा धावडे
जो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जातो, मग तो कोणीही असो, त्याच्या मागे ईडी, सीबीआय, आयटी लावले जाते.
भारतातील प्रसारमाध्यमे, प्रेस, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग या सर्व संस्थावर आज केंद्रसरकारचा दबाव आहे
आपले संविधान हा देशाचा आत्मा आहे, ते वाचवण्याचे काम प्रत्येक भारतीयाला करावे लागेल. असे केले नाही तर हा देश टिकणार नाही.
देश वाचवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं. काँग्रेस आणि देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढू
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मागे घेऊन जात आहेत. देशाला कमजोर करत आहेत.
यूपीए सरकारने शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपये दिले आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काळे कायदे केले.
यूपीए सरकारने मनरेगा हा कामगारांसाठी महत्त्वाचा कायदा दिला, नरेंद्र मोदींनी मनरेगाला कामगारांचा अपमान म्हटले.
बेरोजगारी, द्वेषामुळे देश कमजोर होतो. पण काँग्रेसचा कार्यकर्ताच देशाला वाचवू शकतो. काँग्रेसच देशाला प्रगती पथावर आणू शकतो.