Rashmi Mane
2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष ठरले. लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या धामधूमीनंतर हा रविवार गांधी कुटुंबियांसाठी खास ठरला.
व्यस्त आयुष्यातून थोडा ब्रेक घेत गांधी कुटुंबियांनी खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये राहुल गांधींनी 'फॅमिली लंच करत थोडा वेळ एकत्र घालवला.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा, मिराया वड्रा आणि प्रियांका गांधींच्या सासूबाई यावेळी उपस्थित होत्या.
संपूर्ण गांधी कुटुंब दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आले होते.
राहुल गांधींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लंचचे काही फोटो शेअर केले आहेत.
गांधी आणि वाड्रा कुटुंबीयांनी क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये छोले-भटुऱ्यांचा आस्वाद घेतला.
राहुल गांधींनी कॅप्शन लिहिले की, "नामांकित दर्जेदार रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत जेवण. तुम्ही गेलात तर छोले भटुरे नक्की खा" हे रेस्टॉरंट छोले भटुरेसाठी प्रसिद्ध आहे.