Rahul Gandhi : राहुल गांधींना जामीन मिळालेली सात मानहानीची प्रकरणे

सरकारनामा ब्युरो

'मोदी आडनाव' बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींना २३ मार्च रोजी जामीन मिळाला. सूरत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांना डिसेंबर २०१५ मध्ये ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

Rahul Gandhi, Sonia Gandhi | Sarkarnama

भाजप नेते आणि बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी दाखल केलेल्या खटल्यात राहुल गांधींना ६ जुलै २०१९ रोजी पाटणा कोर्टाने जामीन मंजूर केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

अहमदाबाद येथील न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना १२ जुलै २०१९ रोजी जामीन मंजूर केला. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने हा गुन्हा दाखल केलाय.

Rahul Gandhi | Sarkarnama

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला भाजप-आरएसएस विचारधारेशी संबंध असल्याचे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यावर दाखल मानहानीच्या खटल्यात त्यांना ४ जुलै २०१९ रोजी मुंबईतील एका न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

'आरएसएस'ने महात्मा गांधींची हत्या केली, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. त्यावरुन दाखल खटल्यात नोव्हेंबर २०१६ मध्ये भिवंडी न्यायालयाने राहुल यांना जामीन मंजूर केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

गुवाहाटी न्यायालयाने 'आरएसएस'च्या बदनामीच्या आणखी एका प्रकरणात सप्टेंबर २०१६ मध्ये राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : अदानी ते वायनाड; राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे १० मुद्दे

येथे क्लिक करा