Rashmi Mane
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणातील सोनिपत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सोनिपत येथील एका शेतकऱ्यांच्या थेट शेताला भेट दिली.
राहुल गांधी राज्यांचे दौरे करत असून शेतकरी, आदिवासी, शेतमजूर यांसारख्या विविध समाजघटकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेत आहे.
राहुल गांधी यांचे ट्रॅक्टर चालवतांनाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.
मागच्या काही महिन्यात राहुल गांधी सामान्य लोकांच्या भेटी-गाठी घेत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी ट्रक चालवतानांही दिसले होते.
राहुल गांधी यांनी सोनपत येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतात पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी भाताची लागवड केली.
कुंडली सीमेवर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक कार्यक्रम बदलला आणि सोनीपतच्या दिशेने वळले.
हरियाणामध्ये काही महिन्यांनंतरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनीही रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.