Sunil Balasaheb Dhumal
राज ठाकरे यांचा १४ जून १९६८ रोजी जन्म झाला. त्यांच्या आज ५५ वा वाढदिवस आहे.
राज यांचे खरे नाव स्वरराज आहे. बाळासाहेब ठाकरे त्यांना लाडाने राज म्हणत.
दादर येथील बाल मोहन विद्या मंदिर स्कूलमधील शिक्षणानंतर त्यांनी सर जे.जे.मधून पदवी पूर्ण केली. दरम्यान, लहानपणीच त्यांनी तबला, गिटार आणि व्हायोलिनचे प्रशिक्षण घेतले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा राज यांच्यावर मोठा प्रभाव आहे. राज ठाकरे बाळासाहेब यांच्यासारखेच निष्णात व्यंगचित्रकार आणि उत्तम वक्ते आहेत.
राज ठाकरे शिवसेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
आपले वक्तृत्व शैली अन् नियोजन कौशल्यातून राज यांनी 1990 च्या विधानसभेच्या प्रचारात राज्याचे लक्ष वेधून घेतले.
2005 मध्ये त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. त्यानंतर मार्च 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली.
राज ठाकरे यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनांमुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
राज ठाकरे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता टीका करतात. वेळप्रसंगी त्यांनी विरोधकांचेही कौतुक केले आहे.