सरकारनामा ब्यूरो
हर्षवर्धन जाधव 2009 मध्ये कन्नड मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा राजकीय भूमिका बदलली आहे. सध्या ते मनसेमध्ये नाहीत.
प्रवीण दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर मागाठाणे मतदारसंघातून विजय मिळवला होता. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राम कदम यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. नंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला.
नितीन सरदेसाई राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. 2009 मध्ये त्यांनी माहीम मतदारसंघातून निवडणुक लढवत, विजय मिळवला होता. सरदेसाई सध्या मनसेचे सरचिटणीस आहेत.
गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रमेश वांजळेंनी 2009 मध्ये खडकवासला मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले.
शिशिर शिंदेंनी 2009 मध्ये भांडूप पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2018 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून बाळा नांदगावकरांची ओळख आहे. 2009 मध्ये शिवडी मतदारसंघातून ते आमदार झाले होते. सध्या ते मनसेत आहेत.
मंगेश सांगळे यांनी 2009 मध्ये विक्रोळी मतदारसंघातून विजय मिळवला होता. नंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला.
प्रकाश भोईर यांनीही 2009 मध्ये कल्याण पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजयी मिळवला होता. सध्या भोईर मनसेमध्येच आहेत.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर रमेश पाटील २००९ मध्ये निवडून आले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले होते. मनसेचे आमदार राजू पाटील हे रमेश पाटील यांचे लहान भाऊ आहेत.
नितीन भोसलेंनी 2009 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. भोसले सध्या मनसेतच आहेत.
वसंत गिते यांनी 2009 मध्ये नाशिक मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला होता. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.