Rashmi Mane
राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया ( शिंदे ) यांचा जन्म 8 मार्च 1953 रोजी मुंबईत झाला.
वसुंधरा राजे यांचे वडील ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव सिंधिया हे शेवटचे महाराज होते.
वसुंधरा राजे यांचे वडील राजकारणात होते, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने पदभार स्वीकारला आणि आठ वेळा ग्वाल्हेर आणि गुना मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत.
वसुंधरा राजे त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, कोडाईकॅनल ,तामिळनाडू येथे झाले. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत झाले आहे.
१९८२ मध्ये वसुंधरा राजेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्या राजकारणातील सहभागात त्यांची आई विजयाराजे सिंधिया यांची निर्णायक भूमिका होती.
भारतीय जनता पक्षात अनेक संघटनात्मक पदे सांभाळल्यानंतर १९८५ मध्ये त्या राजस्थानच्या विधानसभेवर निवडून गेल्या.
१९८९ पासून सलग चार वेळा झालावाड, राजस्थान मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या आहेत.