Rashmi Mane
भाजपचे कारंजाचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचे शुक्रवारी निधन झाले.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
विधान परिषद आणि विधानसभेत त्यांनी वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
1997 ते 2003 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले.
2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते कारंजातून विजयी झाले. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
2014 आणि 2019मध्ये भाजपकडून कारंजा विधानसभेतून ते विजयी झाले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
राजेंद्र पाटणी हे अभ्यासू,अत्यंत मृदू स्वभावी व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले नेते म्हणून परिचित होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका आहे.
R