अनुराधा धावडे
१९६५ साली कैंब्रिज यूनिवर्सिटीत शिकत असतानाच राजीव गांधी यांची सोनिया मायनो (आताच्या सोनिया गांधी) यांच्याशी भेट झाली
पहिल्या भेटीतच राजीव गांधी सोनियांच्या प्रेमात पडले आणि आपण याच मुलीशी लग्न करायचं असं मनाशी पक्क ठरवलं होतं
राजीव गांधींनी एका पत्रातून तत्कालीन पंतप्रधान आणि त्याच्या आई इंदिरा गांधींना पत्रातून सोनिया गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
तिकडे सोनिया गांधी यांनीदेखील त्यांच्या आईवडिलांना राजीव गांधी आणि त्यांच्या प्रेमाची कबूली दिली
दरम्यान राजीव गांधींनी दुसऱ्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं आणि सोनिया गांधीदेखील शिक्षण पूर्ण करून इटलीला परतल्या. पण त्यांच्या वडिलांनी राजीव यांच्यासोबत लग्नाला विरोधही केला.
राजीव गांधींना ही बाब कळताच त्यांनी थेट इटली गाठली आणि सोनिया गांधींच्या आईवडिलांसमोरच लग्नाचा प्रस्ताव ठेवला.त्यावेळी इंदिरा गांधीदेखील पंतप्रधान होत्या,
सोनिया गांधी भारतातील वातावरणाशी जळवून घेऊ शकणार नाहीत असं सोनिया मायनो यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं.
त्यावर सोनिया गांधी काही दिवस भारतात राहतील आणि त्यानंतर लग्न करायचं की नाही हे ठरवतील. असं राजीव गांधी म्हणाले.
सोनिया गांधी २१ वर्षांच्या झाल्यानंतर काही दिवस भारतात आल्या, त्यांनाही भारतातील वातावरण, येथील संस्कृती आवडली. इंदिरा गांधीनीही राजीव आणि सोनिया यांच्या लग्नाला होकार दिला.
25 फरवरी 1968 रोजी राजीव गांधी आणि सोनिया गांधींचे दिल्लीत थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला.