Roshan More
अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला जात आहे. मात्र, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे प्रमुख नेते विस्मृती गेले आहेत. लालकृष्ण आडवणी यांनी राम मंदिरासाठी रथ यात्रा काढली होती.
प्रमोद महाजन हे अडवाणींच्या रथ यात्रेचे चाणक्य म्हणून ओळखले जातात.
राम मंदिर आंदोलनातील सर्वात प्रभावी नेत्यांमध्ये उमा भारतींचा समावेश होतो.
बाबरी मशिद पाडणाऱ्यांमध्ये मुरली मनोहर जोशी यांचे आरोपी म्हणून नाव होते.
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल सुरुवातीपासूनच राम मंदिर आंदोलनात सहभागी होते.
हिंदुत्ववादी फायरब्राँड नेता म्हणून साध्वी साध्वी ऋतंभरा यांचा उल्लेख केला जातो. राम मंदिर आंदोलनातील त्यांची भाषणे खूप प्रसिद्ध आहेत.
बाबरी मशिद पाडली त्यावेळी भाजप नेते कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी कार सेवकांच्या विरोधात कारवाई करण्यास विरोध केला होता.
विनय कटियार हे बजरंग दलाचे नेते होते. त्यांचा देखील राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग होता.
NEXT : आयुष्मान कार्ड काढता येईल का? काय आहेत नियम? पाहा एका क्लिक वर...