सरकारनामा ब्यूरो
सध्या आयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट' दर महिन्याला भक्तांना मंदिर उभारणीच्या प्रगतीची माहितीचे फोटो प्रसिद्ध करत असते.
मंदिर उभारणीच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून गृहमंडप आणि सिंहद्वारचे काम सुरू आहे.
राम मंदिर हजारो वर्षासाठी सुरक्षित राहावे यासाठी 'रिटेनिंग वॉल' बांधण्यात येत आहे. ज्याचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.
ऑक्टोबर 2023 पर्यंत तळमजल्याचे काम पूर्ण करण्याचे मंदिर ट्रस्टचे ध्येय आहे.
राम मंदिरामध्ये महर्षी वाल्मिक, महर्षी विश्वामित्र, महर्षी वशिष्ठ, निषाद राज, शबरी यांच्या मंदिरांची उभारणी केली जाणार आहे.
सध्या राम मंदिराच्या तळमजल्याचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय रामललाचे सिंहद्वारही आकार घेत आहे.
इतकेच नाही तर या भव्य मंदिराच्या बांधकामात चंदीगडमधून बनवलेल्या विटा बसवण्यात येत आहेत, ज्यामध्ये रामाचे नाव आणि वर्ष (2021, 2022) लिहिले आहे.
या राम मंदिराच्या 166 खांबांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.