Rashmi Mane
अयोध्येत श्री राम मंदिराच्या उभारणाचे काम झपाट्याने सुरु आहे.
श्री राम मंदिर ट्रस्टने राम मंदिराच्या उभारणीचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिराचे गर्भगृह तयार होईल आणि जानेवारी 2024 नंतर म्हणजेच मकर संक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुले केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले आहे.
मंदिर पायथ्याचे बांधकाम पूर्ण झाल्याचे फोटो देखील ट्विटरवर शेअर केले आहेत.
मंदिराच्या फोटोंवरुन मंदिराची भव्यता सहज लक्षात येत आहे.
मंदिराच्या गर्भगृहाच्या छताचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या आतील भागाचे काम सुरू झाले आहे.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात मूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे.